जवळा गटात 25 वर्षाच्या पोरान अख्या महायुतीची उडवली झोप……

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

सांगोला प्रतिनिधी.

संपूर्ण सांगोला तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जवळा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अवघ्या २५ वर्षांच्या ॲड.यशराजे साळुंखे पाटील यांनी अख्खी महायुती कामाला लावली आहे.

जवळा जिल्हा परिषद गट हा माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.तालुक्याचे माजी आमदार भाजपचे आजी माजी जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशा सर्वांनी एकत्रित येऊन राजकारणात अत्यंत नवख्या असणाऱ्या ॲड यशराजे साळुंखे पाटील यांना घेरण्याचा डाव आखला आहे. मात्र, साळुंखे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात आहे. शिवाय शेतकरी कामगार पक्ष सांगोला तालुका विकास आघाडीच्या पाठिंब्यावर जवळा जिल्हा परिषद गटातील गावोगावी घरोघरी जाऊन प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे .यशराजे साळुंखे पाटील यांच्या उमेदवारीचे प्रामुख्याने तरुण वर्गातून स्वागत होत आहे. गावोगावी त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता महायुती मधील सर्व घटक पक्षांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

 

संपादक - दिपक गोपिनाथ कांबळे Mob -9561769601  
For Feedback - dknirbhidnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon