सांगोला वार्ताहर :-
जवळे (ता. सांगोला) येथील नागरिकांची मागणी
जवळे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयासाठी तात्काळ मंडळ अधिकारी उपलब्ध करून द्यावा, ही संबंधित प्रशासनाकडे नम्र विनंती.
मंडळ अधिकारी नसल्यामुळे नागरिकांची महसुली कामे, दाखले, विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामासाठी लागणारी कागदपत्रे व इतर शासकीय कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत.
संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन जवळे येथे मंडळ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, ही सर्व नागरिकांची अपेक्षा आहे.
सोमवार पर्यंत जवळा मंडल साठी मंडल अधिकारी नियुक्ती नाही केल्यास तलाठी कार्यालय उघडू देणार नाही.



