सांगोला प्रतिनिधी –
जिल्हा परिषद गटाची निवडणूक जाहीर झाल्यापासून जवळा जिल्हा परिषद गटाची जास्त चर्चा होताना दिसत आहे.याचे कारण म्हणजे सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते कै. काकासाहेब साळुंखे पाटील यांची छबी असलेलं नेतृत्व 25 वर्षाचा सुशिक्षित युवक ॲड. सुर्यादित्य उर्फ यशराजे दिपकराव साळुंखे पाटील.
एकट्या युवकाने अर्ज भरल्यापासून संपूर्ण सांगोला तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जवळा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत अवघ्या २५ वर्षांच्या ॲड यशराजे साळुंखे पाटील यांनी राज्यात सत्तेवर असणारी भाजप,शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अख्खी महायुती कामाला लावली आहे. अत्यंत संयमी उच्चशिक्षित आणि सुसंकृत असलेल्या ॲड यशराजे साळुंखे यांना रोखताना माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांना अक्षरशः घाम फुटला आहे.
समाजसेवेसाठी साळुंखे पाटलांची ही तिसरी पिढी कार्यरत झाली आहे. समोरच्या उमेदवाराला आपली जागा, आपण एखतपूर गटात केलेल्या कामाची पावती मिळाल्यामुळे आणि जनतेतून येणारे पडसादा मुळे त्यांची पळता भुई थोडी झाली आहे.



