सांगोला प्रतिनिधी
उद्या गुरुवार दिनांक- 12-02-2026 रोजी सकाळी 10.00 वाजता म्हसोबा रोड जवळा येथे गोधन अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि. जवळा या शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
या प्रथम वर्धापन शिबिराचे अध्यक्ष /उद्घाटक सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार लोकनेते मा.श्री. दिपकआबा साळुंखे पाटील यांचे शुभ हस्ते होणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रदीप खांडेकर (जि.प. सदस्य), सौ. संगिता (सोमा) आबा मोटे (जि.प. सदस्य), ॲड. मा.श्री.यशराजे साळुंखे पाटील (युवा नेते), मा. श्री. श्रीकांत देशमुख (मा. जि.प.सदस्य), श्री.राजू डोरले (उद्योगपती), श्री. तानाजी कोडग (सर ),सौ.काजल मुकेश काशीद (पंचायत समिती सदस्य), श्री.अशोक नामदेव चोरमुले (पंचायत समिती सदस्य) यांची उपस्थिती लाभणार आहे.
अशी माहिती गोधन अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लि. जवळा चे चेअरमन मा.श्री.नितीन विठ्ठल बुरंगे यांनी दिली.



