सांगोला प्रतिनिधी –
आपणास कळविण्यात आनंद वाटतो की, एकाच छताखाली सर्व शासकीय कार्यालये तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी कार्यालय, कृषी सहाय्यक कार्यालय, उपभूमी अभिलेख कार्यालय, अप्पर तहसील कार्यालय मा. आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या दूरदृष्टी विचारातून, जवळा व जवळा पंचक्रोशीतील नागरिकांची कागदपत्रांसाठी होणारी धावपळ आता संपणार आहे.

सांगोला तालुक्यात प्रथमच होणाऱ्या वास्तूचा भव्य असा उद्घाटन सोहळा मंगळवार दि-२४-०२-२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता खालील मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील बहुद्देशीय भवन या वास्तूचा उद्धाटन समारंभ सोहळा….
उद्घाटक मा. दिपक आबा साळुंखे -पाटील (माजी विधान परिषद सदस्य) , अध्यक्ष मा. श्री. उमेशचंद्र कुलकर्णी (गट विकास अधिकारी वर्ग-१ पंचायत समिती सांगोला)व युवा नेते ॲड सुर्यादित्य उर्फ यशराजे दिपकराव साळुंखे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे .
*आपले विनीत*
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ जवळा.
तरी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.



