सांगोला प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या लोकशाहीरीमध्ये गाजलेलं नाव म्हणजे जवळे गावचे सुपुत्र शाहीर सुभाष गोरे.

जवळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा शाहीर सुभाष गोरे यांनी बहाल केला.
नालंदा विद्यापीठाची लोककला क्षेत्रातील डॉक्टरेट मानद पदवी शाहीर सुभाष गोरे यांना बहाल करण्यात आली. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
लोकशाहीरीला आपले जिवन अर्पण केलेले शाहीर गोरे यांनी कलाकारांना प्रथम प्राधान्य दिले. व त्यांनी ही डॉक्टरेट पदवी ही सर्व कलाकारांच्या सहकार्याने व आशीर्वादाने मिळाली आहे असे सांगितले.
मा. आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांनी जवळे गावचे नाव महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर पोहचवील्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.



